मराठी पुस्तक-वाचन मालिका

मराठी पुस्तक-वाचन मालिका

८ मार्च, २०२६

दिनांक

८ मार्च, २०२६

वेळ

जाहीर होणार आहे

स्थळ

व्हिएन्ना

सहभागी

सर्व वयोगटांसाठी खुले

कार्यक्रमाबद्दल

प्रिय मित्रांनो आणि पुस्तकप्रेमींनो, आपले महाराष्ट्र मंडळ ऑस्ट्रिया एक नवीन पुस्तक-वाचन मालिका सुरू करण्यासाठी उत्सुक आहे! या उपक्रमाची सुरुवात करत आहोत, जागतिक महिला दिनाने, म्हणजेच ८ मार्च रोजी. आम्ही तुम्हाला मराठी साहित्य वाचण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी आमंत्रित करतो आहोत. एखादे नुकतेच वाचलेले किंवा आपले आवडते अशा कोणत्याही पुस्तकांचे एखादे प्रकरण किंवा एखादी आवडती कविता आपण एकत्रितपणे वाचू आणि त्यावर आपले विचार शेअर करूया. या प्रयत्नांमुळे आपण व्हिएन्ना येथे एक अभ्यासू वाचन समुदाय तयार करू शकतो. व्हिएन्ना येथे मराठी पुस्तक ग्रंथालय स्थापन करण्याच्या दिशेने आमची वाटचाल सुरु असताना हा उपक्रम त्याचाच एक भाग बनून वाचनालयाचा पाया बनू शकतो असे निदर्शनास आले. आम्ही सर्व वयोगटातील वाचकांचे स्वागत करतो—अनुभवी पुस्तकप्रेमींपासून ते पहिल्यांदाच मराठी साहित्य/कथा वाचत असलेल्या तरुण वाचकांपर्यंत. महाराष्ट्र मंडळाचे ध्येय पुढील पिढी पर्यंत मराठी भाषा आणि कथाकथनाची आवड निर्माण करणे व जोपासणे हे आहे. प्रत्येकासाठी ही मालिका आकर्षक आणि समावेशक कशी बनवता येईल या संबंधित तुमचे विचार आणि सूचना/कल्पना जाणून घ्यायला आम्हाला आवडतील! तुम्हाला उपक्रम आवडला असेल आणि सहभागी व्हायची इच्छा असेल तर आमच्याशी संपर्क साधा. मराठी साहित्य विभाग महाराष्ट्र मंडळ ऑस्ट्रिया

कार्यक्रम शुल्क

मोफत

महत्वाच्या सूचना

  • जागतिक महिला दिनी म्हणजे ८ मार्च रोजी सुरुवात.
  • कोणत्याही पुस्तकातील प्रकरण किंवा आवडती कविता एकत्र वाचू व चर्चा करू.
  • व्हिएन्ना येथे वाचन समुदाय निर्माण करण्याचा उद्देश.
  • व्हिएन्ना येथे मराठी ग्रंथालय स्थापनेच्या दिशेने हा उपक्रम पायाभूत.
  • सर्व वयोगटातील वाचकांचे स्वागत.
  • मालिका आकर्षक व समावेशक बनवण्यासाठी तुमचे विचार व सूचना आम्हाला पाठवा.

मराठी साहित्य विभाग महाराष्ट्र मंडळ ऑस्ट्रिया